ह्या शतकातील एक महान अभिनेते श्री. अमिताभ बच्चन ह्यांचा आज ७३ वा वाढदिवस. माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. तसा मी सिनेमा ह्या विषयापासून बर्यापैकी लांब असलेला माणूस आहे. पण तरीसुद्धा मी बच्चन ह्यांचा चाहता आहे कारण त्या माणसाचे आचरण आणि वृत्ती. लुकडा, लांबडा असा हा माणूस, आकाशवाणी केंद्रावरून त्याला नोकरीच्या मुलाखतीमधून रिजेक्ट केले, का तर म्हणे तुमचा आवाज योग्य आणि लायक नाहीये, पण पुढे ह्याच योग्य आणि लायक आवाजाच्या जीवावर हि व्यक्ती महानायक झाली.
कुली सिनेमाच्या वेळी मोठा अपघात झाला, मुंबई मधील ब्रीच क्यांडी हॉस्पिटल मध्ये जीवन मरणाचा खेळ चालू होता, त्यावेळी मी असेन १०-११ वर्षांचा. देशभर त्यावेळी लोकांनी नवस बोलले होते, पूजा बांधल्या होत्या , आमच्या गल्लीत पण मोठ्या मुलांनी सत्यनारायण पूजा घातली होती, त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या पण मुंबईत हॉस्पिटल मध्ये येउन बच्चन ह्यांच्या तब्येतीची चौकशी करून गेल्या होत्या, कारण त्या वेळी बच्चन आणि गांधी कुटुंबीय ह्यांचे परस्पर संबंध हे कौटुंबिक पातळीवर असल्यासारखे होते, बच्चन साहेब त्यातून बरे झाले.
नंतर राजीव गांधी पंतप्रधान असताना बोफोर्स घोटाळा उघडकीस आला, त्यात बच्चन ह्यांना गोवण्यात आले, तेव्हा ते खासदार होते, त्यांनी आधीच खासदारकीचा राजीनामा दिला होता. कारण राजकारण हे आपले क्षेत्र नाही हे त्यांना कळून चुकले होते. बोफोर्स प्रकरणातून ते सहीसलामत बाहेर पडले.
नंतर स्वतःची एबिसिएल हि कंपनी काढली, तिच्या मार्फत सिनेमा काढले, ते सगळे डब्यात गेले. कंपनी दिवाळखोरीत गेली. मोठे अपयश आले. ते इतके मोठे होते कि एकदा त्यांच्या बंगल्याचे लाईट बिल भरलेले नाही म्हणून लाईट तोडायला माणसे आली होती, तेव्हा बच्चन साहेबांनी अभिनेते प्राण ह्यांनी फोन केला आणि प्रसंग सांगितला, प्राण ह्यांनी कोरा चेक बच्चन ह्यांच्याकडे पाठवून दिला होता. त्यांचा इतका विश्वास होता ह्या माणसावर .

एबिसिएल चे अपयश भरून निघाले ते उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या प्रचारामुळे आणि अमरसिंग ह्यांच्याशी झालेल्या अथवा केलेल्या मैत्रीमुळे. मग मात्र तेथून पुढे ह्या माणसाने कामे मिळवली आणि परत आपले स्थान पक्के केले.
कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन ह्यांच्याशिवाय दुसरे कुणीही काम करू शकत नाही हे पण काळाने सिद्ध झाले आहे.
अजूनही रोज नियमित व्यायाम करतात , व्यसन नाही, पूर्ण शाकाहारी व्यक्तिमत्व.
एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती टोकाचे प्रसंग येतात आणि तो त्यातून कसा मार्ग काढत पुढे जातो त्याचे हे उदाहरण. व्यक्तिमत्व विकास चे क्लास घेणार्यांनी ह्या माणसाच्या आयुष्याचा मागोवा घ्यायला सांगितले पाहिजे विद्यार्थ्यांना.
दर रविवारी आपल्या बंगल्याबाहेर जमलेल्या लोकांना दर्शन देण्यासाठी हि व्यक्ती बंगल्यात हजर राहते आणि लोकांना दर्शन देते, किमान ५००० लोक तिथे ह्या ७३ वर्षीय अभिनेत्याला पाहायला देशभरातून दर रविवारी आलेले असतात. अत्यंत सभ्य व्यक्तिमत्व. त्यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.एखाद्या माणसाच्या आयुष्यात किती टोकाचे प्रसंग येतात आणि तो त्यातून कसा मार्ग काढत पुढे जातो त्याचे हे उदाहरण. व्यक्तिमत्व विकास चे क्लास घेणार्यांनी ह्या माणसाच्या आयुष्याचा मागोवा घ्यायला सांगितले पाहिजे विद्यार्थ्यांना.

No comments:
Post a Comment